वधू परिचय पुस्तिकेचे विमोचन

सामजिक कार्यात सदैव अग्रेसर आसणारी सामाजिक संस्था मराठा समन्वय मंचाच्या वतीने दिवाळी निमीत्ताने सोयरीक या मराठाउपवर – वधू परिचय पुस्तिकेचे विमोचन नागपूर महाराज श्रीमंत डाॅ राजे मुधोजी महाराज भोंसले व इतर प्रतिष्ठित मान्यवराच्या हस्ते झाले.

श्री.गजानन कावळे च्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून जेष्ठ समाजसेवक श्री. बंडू शिंदे, श्री. सुशांत शिंदे उपस्थित होते. या समारोहाचे प्रास्ताविक श्री. मोहन जाधव तर आभार प्रदर्शन श्री. संजय घारगे तसेच सुत्रसंचालन मराठा समन्वय मंचाचे मुख्य संयोजक श्री. सतिष गिरमकर यांनी केले.

विमोचन सोहळ्यास मराठा समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.