गोंदिया राॅयल च्या शपथ ग्रहण समारोहास मुख्य अतिथि व शपथ ग्रहण अधिकारी म्हणून नागपूर महाराज व लाॅयन्स क्लब चे महाराष्ट्र माजी चेअरमन (PMCC) श्रीमंत डाॅ राजे मुधोजी महाराज भोंसले

विदर्भ प्रांताच्या सक्रीय क्लब मधे गणना होणारा क्लब म्हणजे लाॅयन्स क्लब गोंदिया_राॅयल च्या शपथ ग्रहण समारोहास मुख्य अतिथि व शपथ ग्रहण अधिकारी म्हणून नागपूर महाराज व लाॅयन्स क्लब चे महाराष्ट्र माजी चेअरमन (PMCC) श्रीमंत_डाॅ राजे मुधोजी महाराज भोंसले प्रामुख्याने उपस्थित होते.

या सोहळ्यास प्रमुख वक्ता म्हणून लाॅयन्स क्लब महाराष्ट्र चेअरमन (MCC) & मालपाणी उद्योक समुहाचे संचालक श्री. गिरीश मालपाणी, प्रमुख अतिथी H1 उपगवर्नर (VDG2) श्री. टी. व्ही. श्रवण कुमार, रिजन चेअरमन & भाजपा नेते श्री. दिपक कदम, झोन चेअरमन श्री. दिलीप चौरागडे नवनियुक्त क्लब अध्यक्ष श्री. प्रशांत_वढेरा,लिओ अध्यक्षा रेणू जयपूरीया व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.

या समारंभाला सभागृहात उपगवर्नर (VDG1) श्री. राजेंद्रसिंग बग्गा, माजी गवर्नर (PDG) श्री. विनोद जैन, राॅयल क्लब संस्थापक अध्यक्ष (चार्टर्ड प्रेंसीडेंन्ड) श्री.  रितेश अग्रवाल सह प्रांत पदाधिकारी, क्लब पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सोहळा यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष श्री.  राहूल_अग्रवाल व त्यांच्या सहकांर्यानी अथक परिश्रम घेतले. या सोहळ्याचे सुत्रसंचालन श्री. शिवा अग्रवाल व श्री. विनय शाहू यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. राम अग्रवाल नी केले.