
नागपूर- मराठा समाजासाठी समाजीक बांधीलकी जपत मराठा समन्वयक मंचाच्या माध्यमातुन सतत नवनविन उपक्रम राबविणारे मंचाचे मुख्य समन्वयक श्री. सतिष गिरमकर यांच्या संकल्पनेतून चंपाष्टी च्या निमित्ताने भक्तगणासाठी प्रसाद वितरण व सन्मान सोहळा नागपूर महाराज श्रीमंत डाॅ राजे मुधोजी महाराज भोंसले च्या प्रमुख उपस्थितीत नागपूरच्या ऐतिहासिक खंडोबा मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर व खंडोबा मंदिराचे विश्वस्त प्रामुख्याने उपस्थित होते.



