
नागपूर- मराठा सेवा संघाच्या आमंत्रणाचा स्वीकार करून नागपूर महाराज श्रीमंत डाॅ राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी आज मराठा सेवा संघाच्या नागपूर_कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या सदिच्छा भेटीचे औचित्य साधून मराठा सेवा संघाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले शिवधर्म दिनदर्शिकेचे विमोचन मुधोजी राजे भोंसले च्या हस्ते झाले. या छोट्या खाणी आयोजित समारंभाला मराठा सेवासंघाचे कार्याध्यक्ष शिवश्री मधुकर मेहकरे, समाजसेविका सौ. संयोगिता धनवटे, श्री. बबनराव नाखले, प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
या सदिच्छा भेटीचे व प्रकाशन सोहळ्याचे आभार प्रदर्शन शिवश्री डहाके,तर मंच संचालन शिवश्री आनंद मांजरखेडे यांनी केले.





