भोंसले कालीन श्रीसिद्धिविनायक गणेश मंदिर (शुक्रवारी तलाव)
सेना धुरंधर श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (प्रथम) हे शुर लढवैये होते, व श्री गणेशाचे भक्त होते. त्यांनी सन १७८६ साली तलावा काठी मंदीर बांधुन श्री गणेशाची स्थापना केली. त्यांच्या निधना नंतर हे मंदीर श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (द्वितीय) यांनी त्या वेळेसचे पुजारी श्री ताम्हणकर यांना तांम्र पत्र देऊन स्वाधिन केले. आजही हे तांम्रपत्र श्री ताम्हणकर परिवाराकडे आहे. सन १८१८ साली ब्रिटीशांनी जेव्हा राजवाड्याला जाळले, तेव्हा ह्या मंदीराला सुध्दा जाळले. मग या मंदीराची पुनर्निर्मिती करुन आधुनीक पध्दतीने बांधण्यात आले. श्री गणेशाची मुर्ती सहा फुटाची असुन ती अतिशय सुंदर आहे. ही मुती उजव्या सोंडेची असुन श्री गणेशाने एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात कमळाचे फुल, डाव्या हातात पाश’तर उजव्या हाताने मोदक खात आहे. नागपूरात कदाचीतच अशी सुंदर मुर्ती बघायला मिळेल; ह्यामंदिराची पुजाअर्चना व देखरेख/ श्री मधुसूदन ताम्हणकर व त्याचे चिरजीव दिनेश ताम्हणकर यांच्याकडे आहे.
भोंसले कालीन श्री कल्यानेश्वर शिव मंदिर (तेलंगखेडी)
सन १७८५ मध्ये ह्या मंदीराची निर्मीती करण्यात आली. त्या काळी हे मंदीर शहराच्या बाहेर होते. शिव हे योगी असल्यामुळे श्रावण महिण्यात फळ व कंदमुळे नेवेद्य म्ह॑णुन चढविल्या जात असे. त्या करिता शिवमंदिराच्या यांच्या चारही दिशेचा परिसरात फळझाडांचा बगीचा लावविण्याल आला होला.
भोंसले कालीन श्री पाताळेश्वर मंदिर (महाल)
या मंदिराची निर्मीती सन १८३० मध्ये श्रीमंत राजे रघुजी भोंसले (द्वितीय) यांनी केली. राजवाड्याच्या उत्तर द्वाराजवळ खोदकाम करित असतांना जमिनीच्या आत हे शिवलिंग सापडले. हे शिवलिंग पाताळात सापडल्याने त्या शिवलिंगाची स्थापना खोल भागात करुन ह्या ठिकाणी भव्य ‘असे शिवमंदीर बांधण्यात आले. आणि त्या मंदिराला श्री पालाळेभर मंदीर असे संबोधित करण्यात आले. आजही हे शिव मंदिर (पाताळेश्वर) सिनियर भोंसले ईस्टेटच्या मालकीचे आहे.
भोंसले कालीन श्री नागेश्वर मंदिर (महाल)
सन १८३० मध्ये श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) यांनी राजघराण्यातील स्त्रियांसाठी राजवाड्याच्या परिसरात मध्यभागी ह्या मंदीराची निर्मीती केली. भगवान शंकर हे गळ्यात नाग धारण करित असल्यामुळे त्यांचे एक नाव नागेश्वर असे आहे. म्हणून या मंदिराला श्री नागेश्वर मंदिरा असे नाव देण्यात आले. आजही हे मंदिर सिनियर भोंसले ईस्टेटच्या मालकीचे आहे.
भोंसले कालीन श्री रुक्मिणी मंदिर (महाल)
सन १७९५ मध्ये श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (दितीय) यांनी राजवाड्याच्या मागील बाजुस रुख्मिनी मंदीर परिसरात श्री लक्ष्मीनारायण मंदीराची निर्माती केली. ह्या मंदिराला सोन्याचा कळस, चांदीचा दरवाजा, चांदीची घंटा आहे. आजही हे मंदिर सिनियर भोंसले ईस्टेटच्या मालकीचे आहे.
भोंसले कालीन श्री रघुराजेश्वर मंदिर
सन १७९५ मध्ये श्रीमंत राजे रघुजीराव भोसले (द्वितीय) यांनी या मंदीराची निर्मीती केली. राजदरबारात रुख्मीनी नावाची राज नर्तकी होती व तीच्या ईच्छेनुसार आपली व महाराजांची आठवण राहील म्हणून हे मंदिर बांधण्यात आले. या मंदीराचे नाव श्री रघुराजेश्वर मंदीर असे ठेवण्यात आले. हे मंदिर राजवाड्याच्या मागच्या बाजुला श्री रुक्मिणी मंदीर परिसरात असुन आजही हे मंदिर सिनियर भोंसले ईस्टेटच्या मालकीचे आहे.
भोंसले कालीन श्री राम मंदिर (त्रिवेदी वाडा, महाल)
श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (तृतीय) यांनी ह्या वाड्याची व राम मंदीराची निर्मीती सन १८१८ या साली केली. त्या काळी महाराज नियमीत पुजा अर्चना करण्याकरिला मंदीरात जायचे ह्या वाड्याचे व मंदीराचे देखरेख करण्याची जवाबदारी श्री. सदाजी वांगाजी त्रिवेदी यांना देण्यात आली आजही त्यांचे वंशज श्री नटवरलाल मनिलाल त्रिवेदी हे पुजा अर्चना व व्यवस्थापन बघलात.
भोंसले कालीन श्री हनुमान खिडकी मंदिर (महाल )
त्या काळी भोसल्यांचा राजवाडाचा परिसर कोतवाली, महानगर पालीका, शुक्रवार तलावापर्यंत होता. हे मंदीर राजवाड्याच्या खिडकीमधुन दिसत असल्यामुळे श्रीमंत राजे मंडळी तेथुन दर्शन घ्यायचे, व म्हणूनच या मंदिराला श्री हनुमान खिडकी मंदिर असे नांव पडले. आजही हे मंदिर सिनियर भोंसले ईस्टेटच्या मालकीचे आहे.
भोंसले कालीन श्री लक्ष्मी नारायण मंदिर (लहान राजवाडा, महाल )
हे मंदीर सन १७९२ मध्ये श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (द्वितीय) यांच्या काळात बांधण्यात आले. हे मंदीर रेखीव व भव्य आहे. मंदीराच्या कामास सुमारे तीन वर्षाचा कालावधी लागला. ह्या मंदिरातील संगमरवरी मुर्त्या राजस्थान वरुन बनवुन आल्या. हे मंदीर श्रीमंत राजे लक्ष्मणसिंह राजे तेजसिंगराव भोंसले यांच्या ईस्टेटच्या माळकोचे आहे.
भोंसले कालीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (मोठा राजवाडा, महाल )
श्री विठ्ठल रुख्मिनी मंदीर श्रीमंत राजे रघुजीराव महाराज भोंसले (तृतीय) यांनी सन १८६० या साली मोठा राजवाडा या परिसणात बांधले. हे मंदीर आजही हे मंदिर सिनियर भोंसले ईस्टेटच्या मालकीचे आहे.
भोंसले कालीन श्री मुरलीधर मंदिर (सोनेगाव विमानतळ )
सोनेगांव विमानतळ येथे भोंसला सैनिकांची छावनी होती. सैनिकांना पुजा अर्चना करण्यासाठी ह्या मंदिराची निर्मिती सन १७६० मध्ये श्रीमंत राजे रघुजीराव महाराज भोंसले (द्वितीय) यांनी केली. मंदीराचे वैशिष्ट्ये म्हणजे श्रीकष्णांची मुर्ती मध्य भागी असुन रुख्मिशी व सत्यभामा दोन बाजुला आहे. यामंदीरच्या चारही बाजुला दगडी परकोट आहे.
भोंसले कालीन श्री गणेश मंदिर (त्रिवेदी वाडा, महाल)
श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (तृतीय) यांनी मंदीराची निर्मीती करुन त्रिवेदी परिवाराकडे पुजा, अर्चना व व्यवस्थापन दिले. ले आज पर्यंत नटवरलाल मनिलाल त्रिवेदी परिवार सांभाळत आहे.