भोंसले इतिहास

१९ फेब्रुवारी १६३० ला श्रीमंत छत्रपती राजे शिवाजी महाराज भोंसले यांचा जन्म झाला

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.




निश्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी
परोपकाराचीया राशी | उदंड घडती जयासी
तयाचे गुण महत्वासी | तुळणा कैची
नरपति, हयपति, गजपति | गडपति, भूपति, जळ पति
पुरंदर आणि शक्ती | पृष्टभागी
यशवंत, किर्तीवंत | सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत नीतिवंत | जाणता राजा
आचारशील विचारशील | दानशील धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील | सकळा ठायी
धीर उदार गंभीर | शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर | तुच्छ केले
तीर्थक्षेत्रे मोडिली | ब्राम्हण्स्थाने भ्रष्ट झाली
सकाळ पृथ्वी आंदोळली | धर्म गेला
देव धर्म गोब्राम्हण | करावया संरक्षण

हृदयस्थ झाला नारायण | प्रेरणा केली
उदंड पंडित पुराणिक | कवीश्वर याज्ञिक वैदिक
धूर्त तार्किक सभानायक | तुमच्या ठायी
या भू मंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही | तुम्हा कारणे
आणिकही धर्मकृत्ये चालती | आश्रित होउन कित्येक राहती
धन्य धन्य तुमची कीर्ती | विश्वी विस्तारली
कित्येक दुष्ट संहारिले | कित्येकासी धाक सुटले
कित्येकासी आश्रय जाहले | शिवकल्याण राजा
तुमचे देशी वास्तव्य केले | परंतु वर्तमान नाही घेतले
ऋणानुबंधे विस्मरण जाहले | काय नेणो
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती | सांगणे काय तुम्हाप्रती
धर्मसंस्थापनेची कीर्ती | सांभाळली पाहिजे
उदंड राजकारण तटले | तेणे चित्त विभागले
प्रसंग नसता लिहीले | क्षमा केली पाहिजे

३ एप्रिल १६८० ला रायगडावर शिवाजीराजांचे निधन झाले


१४ मे १६५७ ला पुरंदरवर धर्मवीर श्रीमंत छत्रपती राजे संभाजी महाराज भोंसले यांचा जन्म झाला.

देश धरम पर मिटने वाला । दोनो पैर कटे शंभू के वर्ष चार सौ बीत गये अब
शेर शिवा का छावा था । ध्येय मार्ग से हटा नहीं । शंभू के बल्निदान को ।
महा पराक्रमी परम प्रतापी । हॉँथ कटे तो क्स्या हुआ कौन जिता कौन हारा ।
एक ही शंभू राजा था । सत्कर्म कभी भी छुटा नहीं ॥ पूछ लो संसार को ॥।
तेजः पुंज तेजस्वी आँखे जिव्हा कटी खुन बहाया मातृभूमी के चरप्ण कमल पर
निकल गयी पर झुका नहीं ।॥ धर्म का सौदा किया नहीं । जिवन पुष्प चढाया था ।
दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नति कका शिवाजी का ही बेटा था बह हे दूजा दुनिया में कोई
‘दिव्य स्वप्न तो मिटा नहीं ॥ गलत राह पर चला नही ॥। जैसा शंभू राजा था ॥।

९९ मार्च ९६८९ ला धर्मवीर शंभु राजाचे निधन झाले.


सिसोदीया राजवंश (सूर्यवंशी)। नागपूर राज्याचे संस्थापक

राजे रघूजी महाराज (प्रथम) यांचा जन्म १४ फेब्रुवारी १६९५ मध्ये साताऱ्यात झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतणे होते. राजे रघूजी हे फार शूर व पराक्रमी असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यु नंतर त्यांनी आपला मोर्चा मध्यप्रदेशाकडे वळवला. त्यांनी मध्यप्रदेशातील ३६ दिवसात ३६ किल्ले जिंकले व छत्तीसगढची स्थापना केली. तेथील सर्व राजे मांडलिक झाले व खंडणी देऊ लागले. राजे रघूजींचा पराक्रम ऐकून देवगढची राणी रतन कुंवर यांनी दासी पुत्र चांदशाहच्या कैदेतून मदत मागीतली राणीला मदत करण्याकरिता त्यांनी देवगढवर स्वारी करुन राणी रतन कुंवर व तिच्या दोन पुत्रांची सुटका केली. राजे रघूजी महाराज हे पंचहत्यारी होते. (तलवार, दानपट्टा, कट्यार, बिछवा, धनुष्यबाण) त्यांनी रामटेक येथील भग्न अवस्थेतील मंदिराचा जिर्णउध्दार करुन अंबाळा तलावातील श्री रामचंद्र स्वामी, श्री लक्ष्मण स्वामी व सीता मातांच्या मुर्त्या काढून त्यांची मंदिरात स्थापना केली. त्यांनी अटक ते कटक पर्यंत नागपूरकर भोसल्याचा भगवा झेंडा रोवला. इ.स. १७३६ मध्ये महाराजांनी नागपूर राज्याची स्थापना केली. व इ.स. १७३८ मध्ये त्यांच्या ह्या विशाल पराक्रमाचा गौरव करण्याकरिता जनतेने त्यांचा राज्याभिषेक केला व ते सम्राट झाले. त्यांच्यावर छत्रधरण्यात आले. चवरी मोरचल धरण्यात आले. व पायात हीरेजडीत सोन्याचा तोडा घालण्यात आला. अश्या पराक्रमी महाराजांचा निधन १४ फेब्रुवारी १७५ ५ मध्ये नागपूर मुक्कामी झाला.


सेनाधुरंधर श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (प्रथम)

मुधोजी महाराज (प्रथम) यांचा जन्म १७३५ ला झाला. ते रघूजी महाराजांचे हितीय पुत्र होते. ते फार शुर व कर्तबगारअसल्यामुळे त्यांनी नागपूर राज्याचा विस्तार केला. त्यांनी सेना धुरंधर ही पदवी प्राप्त केली. चौदा वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत बराच नाव लौकीक मिळविला. प्रजेच्या बाबतीत त्यांची वागणूक समानतेची, प्रेमाची व सहानुभूतीची होती. सर्वच धार्मिक उत्सवात ते आवर्जुन भाग घेत असत. साधुसंत, पीर व गुरूंच्या सहवासात राहणे त्यांना आवडत असे. हिंदु- मुसलमान प्रजेत त्यांनी कोणताही भेदभाव केला नाही. त्यांनी उमरेड येथ किल्ला बांधला व नगरातील किल्यांचा जिणोंध्दार केला. त्यांनी गिरड येथील शेख फरीदबाबा यांच्या चिल्यासाठी वार्षिक मानधन ठरवून दिले होते. त्यांना मनोरंजनाची पण आवड होती. ते प्राण्यांची झुंज, शिकारकरणे, नौकाविहार, उद्यानात सहल व सहभोजन, नृत्य व गायन, बेठेखेळ, बुध्दिबळ, सोंगट्या, गंजीफा, कुसत्या, गारुड्यांचा खेळ, घोडदौड व पतंग उडविणे असे कार्यक्रम आयोजित करायचे त्यांची कारकोर्द फार उत्तम होती. सेना धुरंदरांचे निधन १९/ ५/ १७८८ ला वयाच्या ५ ३ व्या वर्षी झाले.


आधुनिक नागपूर नगरीचे शिल्पकार व निसर्ग प्रेमी श्रीमंत राजे रघूजी महाराज भोंसले (द्वितीय)

दुसऱ्या रघुजींचा जन्म १७६० मध्ये झाला. दूसर्या रघुजींचा काळ शांततेचा होता. त्यांनी नागपूरात ९८ मंदिरे बांधली. त्यात ५४ महादेवाची, ४ लक्ष्मी- नारायणाची, २ मुरलीधराची, २४ हनुमानाची, ६ पांडुरंगाची, १ श्री भवानी मातेची, १ नागोबा, १ बालाजी, ९ श्री खंडोबाचे अशी त्यांनी भारतात एकूण ६५ ० मंदिरे बांधली. त्यांनी बऱ्याच बागांची निर्मीती केली. उदा.: केळीबाग, तुळशीबाग, बेलबाग, मोतीबाग, इंदुलीबाग, नागपूर सुंदर व हिरवे दिसण्या करीता त्यांनी बरीच उद्याने निर्माण केली. उदा.: सोनगांव बगीचा, तेलंगखेडी उद्यान, सक्करदरा उद्यान त्यांनी बऱ्याच विहीरी व तळे बांधले. ते प्राणिमीत्र असल्यामुळे त्यांनी नागपूरातील पहिले प्राणी संग्रहालय (महाराज बागेत) निर्माण केले. त्यांनी बिहार मधील छोटा नागपूर येथून संत्र्याची कलमे आणून नागपूर आणि सभोवतालच्या प्रदेशात झाडे लावली. त्यामुळे नागपूरचे नाव ”संत्रानगरी” म्हणून जगभरात प्रसिध्द झाले. त्यांच्या कारकिर्दीला सुवर्णयुग म्हणता येईल. यांचा निधन २२ मार्च १८१६ मध्ये वयाच्या ५६ व्या वर्षी झाला.


सरकार समशेर बहादूर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोंसले.

राजे खंडोजी भोंसले हे मुधोजी राजे (प्रथम) यांचे द्वितीय पुत्र होते. ते लहानपणा पासूनच फार शूर व पराक्रमी होते. राज्याचा विस्तार करण्याकरिता त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षा पासून बंगालवर तिनदा स्वाऱ्या केल्या. त्या मध्ये त्यांना बऱ्याच (मुस्लिम धर्माच्या) सवार्यांची (अलम) प्रचीती येऊन प्राप्ती झाली. उदाहरणार्थः ”तंबाकूवाली”, ‘“बडे नालसाहेब”, ”नाल्याहैदर” ‘“पंजा” , “शाहीसवारी”, अशा बर्याच सवाऱ्या त्यांनी नागपूरला आणल्या, एकदा बंगालवर विजय मिळवून परत येत असतांनी कुळचारी गणपतींचे विसर्जन झाले. श्री गणपतीला बोललेला नवस पुर्ण करण्याकरीता इ.स. १७५५ मध्ये श्रीमंत खंडोजी महाराज भोंसले यांनी मसकऱ्या (हाडपक्या) गणपतीची स्थापना करुन त्यात विविध नकला, लावण्या, खड़ी गंमत या सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करुन हा आनंदोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा केला सतत बंगालवर स्वाऱ्या केल्यामुळे तेथील लोकांमध्ये त्यांचा धाक निर्माण झाला होता, व चिमण्यासारखी भरारी असल्यामुळे त्यांना चिमणाबापू म्हणत होते. सतत तलवार तळपत असल्यामुळे त्यांना सरकार शमशेर बहादूर हि पदवी प्राप्त झाली. अशा या शूर-विराचे वयाच्या २५ व्या वर्षी हृदयघातांनी नागपूर मुक्कामी निधन झाले.


श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले उर्फ अप्पासाहेब (द्वितीय)

श्रीमंत अप्पासाहेबांचा जन्म १७९६ मध्ये झाला. श्रीमंत राजे मुधोजी महाराज (द्वितीय) (उर्फ अप्पासाहेब) हे दूसर्या रघुजी महाराजांचे पुतणे होते. मुधोजी महाराज फार हुशार व कर्तबगार होते. त्या वेळेस ब्रिटीशांचे नागपूरचे राज्य काबीज करण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यांनी राज्य वाचवण्यासाठी ब्रिटीशांशी युध्द केले. सिताबर्डी किल्ल्यावर झालेल्या लढाई मध्ये त्यांचा पराभव झाला. १८१८ मध्ये राज्य खालसा करुन मुधोजी महाराज यांना कैद केले. व आलाहाबादच्या ४ किल्यात ठेवण्यासाठी कडक बंदोबस्तात नेत असतांना १३/५/ १८१८ ला रायपूर मुक्कामी तळ असतांना कैदेतून निसटून ते थेट महादेवाच्या डोंगरात चौऱयागढ टेकडीवर पोचले. त्यांनी डोंगरात ब्रिटीशांना अनेक दिवस चकवीले. ब्रिटीशांनी अप्पासाहेबांस पकडून देणाऱ्यास २ लाख रुपये व १ ० हजार ची जहागीर असे बक्षीस ठेवले. मुधोजी महाराजांनी अनेक संस्थानात भोपाल, लाहोरला रणजितसिंग, हिमाचल प्रदेशातील मंनडी- डेहरी- गढवाल व नागोर आदि अनेक संस्थानात ब्रिटीशां विरुध्द मदत मागितली, पण कोणी भितीने त्यांना मदत केली नाही. शेवटी जोधपूरच्या एका मंदिरात गोसाव्याच्या वेशात राहत असतांना तेथील राजनर्तकीला हिऱ्याची अंगठी बक्षीस दिली, त्यामुळे ब्रिटीशांच्या लक्षात आले व त्यांनी तिथल्या राजाकडे मुधोजी महाराजांना मागितले, तेव्हा जोधपूर महाराजांनी ब्रिटीशांना नकार देऊन राजांना आपल्या जवळ ठेऊन घेतले. अशा ह्या नागपूरच्या स्वाभिमानी राजाचा जोधपूरलाच १५/७/ १८४० ला निधण झाले. आजपण त्यांची समाधी जोधपूरच्या राज घाटात आहे. असे हे शूर- वीर मुधोजी महाराज नागपूरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे पहिले स्वातंत्र्य सेनानी होते.


श्रीसंत राजे रघुजी महाराज भोंसले (तृतिय)

रघूजी महाराज (तिसरे) यांचा जन्म १६/८/ १८०७ मध्ये झाला. २६/६/ १८१८ मध्ये वयाच्या १० व्या वर्षी तिसरे रघूजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ते उत्तम राज्यकर्ते होते. राज्यात दर पाच वर्षांनी जणगणणा होत असे. जन्म मृत्युची नोंद केली जाई. नागपूर बहु भाषी राज्य होते. विविध राज्यातील पण लोक येऊन स्थायिक झाले होते. झाडी कुणबी, मारवाडी, अग्रवाल, मुसलमान वगैरे मराठी, हींदी, गोंडी प्रमुख भाषा होत्या. कानडी, तेलगु, उडीया बोलली जात असे. राज्य कारभार मराठीत चालत असे. हिंदू मुस्लीम सलोखा होता. राज्याच्या मुलकी व लष्करी विभागात मुस्लीम होते. राज्याचे सल्लागार व वैद्य मुस्लीम होते. महाराजांनी शिक्षण व्यवस्था उत्तम केली होती, प्रत्येक जिल्ह्यात १ शिक्षकी शाळा होती. लिहीणे वाचणे व गणिताचे शिक्षण दिले जात होते. पंडित संस्कृतच तर मौलवी फासींचे शिक्षण देत असत. राज परिवार सुशिक्षीत व्हावा म्हणून शिक्षकांची नेमणूक केली होती. साहित्य क्षेत्रातही बरीच प्रगती झाली होती. संस्कृत, उर्दू व फार्सी मध्ये दर्जेदार ग्रंथ निर्माण झाले होते. त्यांनी ३६ वर्ष उत्तम कारभार केला. ११/ १ २/ १८५३ ला वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.


श्रीसंत राजे बहादूर जानोजीराव महाराज भोंसले (दितीय)

श्रीमंत जानोजी महाराज हे लहान वया पासूनच अतीशय बुध्दीमान होते. त्यांनी वेध, शास्त्र, पुराण आत्मसात केले होते. त्यांचे सहा भाषांवर प्रभुत्व होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, फार्सी, उर्दू संस्कृत. त्यांनी त्यांच्या पणजी श्रीमंत महाराणी बाकाबाई साहेब यांच्या साठी मोठा यज्ञ करुन त्यांनी १ ०८ गायींचे दान केले होते. त्या गायींना सोन्याचे तोडे पायात, शिंगांना सोन्याच्या श्याम्या (कव्हर) व हिरे- मोती लागलेल्या झुलींनी गाईंना सजवले होते. १८६८ मध्ये तसेच पुत्र प्राप्तीसाठी पुत्र-कामेष्ठी यज्ञ राजा सोनेगांव येथील पंचमुखी महादेवाच्या मंदिरात केला होता. त्यांनी १८६१ मध्ये भोसल्यांच्या सर्व मंदिराचे २ १ खासगी ट्रस्ट केले होते. उदाहरणार्थ : रामटेक, अलाहाबाद, बाबा फरीद (गिरड) व मुरलीधर मंदिर राजा सोनेगांव. त्यांना ब्रिटीश गव्हरमेंट कडून ३ पोलीटीकल पेंशन होत्या. दिल्लीच्या दोन, सरंमाजी व राजा बहादूर म्हणून व (देऊर) सातारा इस्टेटची त्यांनी बऱ्याचश्या ऐतिहासीक वा पौराणीक मंदिरांना देणग्ण्या दिल्या व बऱ्याचस्या मंदिरांचा जिर्ण उध्दार केला. १८८ ९ मध्ये यांचे निधन झाले.


श्रीसंत राजे बहादूर रघुजीराव महाराज भोंसले (चतुर्थ)

राजे रघूजी महाराजांचा जनम १९/ १ १/ १८७ २ मध्ये झाला पुत्र कामेष्ठी यज्ञा नंतर त्यांचा जन्म झाल्यामुळे ते फार धार्मिक वृत्तीचे होते. ते अष्टकला मध्ये पारंगत होते. त्यांनी स्वतः अनेक भजन रचली. संत गजानन महाराज १९ १ ९ मध्ये नागपूर मुक्कामी रघूजी महाराजांना भेटण्यास आले होते. सरजू नावाची पाळीव वाघीण त्यांच्या सोबत फिरायची. त्या वाघीणीची समाधी आजही राजे रघुजी नगर येथे आहे. त्यांनी गढवालचे परमहंस हिरासिंग बाबांना सन १९०५ मध्ये भोंसले वाड्यात आणले. श्री संत हिरासिंग बाबा यांनी १८/ १ २/ १९ ९ १ रोजी श्री लक्ष्मी नारायण मंदिरा जवळ, राजे रघुजी नगर येथे जिवंत समाधी घेतली. महाराजांना पाच घोड्यांच्या बग्गीचा मान होता. रघुजी महाराजांनी १९०६ मध्ये त्यावेळेसचे २० ० ० रुपये भरुन नागपूरच्या पागल खान्यातून सात मंजली लाल बंगला, राजे रघुजी ( नगर येथे श्री संत ताजुद्दीन बाबा अवलिया यांना आणले. दिनांक १७/८/ १९२५ ला श्री संत बाबांनी लाल बंगल्यातच पडदा घेतला. परमहंस केजाजी महाराज (घोराड) उपासनी बाबा अस्या बऱ्याच संतांचे सानिध्य त्यांना लाभले. वसंत पंचमी उत्सव व कार्तीक महोत्सव थाटात साजरा करीत होते. १९ १ ९ मध्ये पंचम जॉर्ज यांच्या दिल्ली दरबारात महाराजांचा बोरा एवढ्या मोत्यांचा १ १ पदरी कंठा तुटला. ते मोती इंग्रजांच्या बायका व सरदारांनी गोळा करुन परत करण्यास नेले असता, महाराज म्हणाले ते ठेवून घेणे. तेव्हा पंचम जॉर्ज यांनी महाराजांना मोतीवाला राजा असे संबोधिले. १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थपनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. अस्या ह्या राजश्री महाराजांचे निधन २१/ ५/ १९५८ मध्ये झाले. त्यांना २ १ तोफांची दिल्ली सरकार तर्फे सलामी देण्यात आली व विमानांनी पुष्पवृष्टी करण्यात आली.


लोककराजा श्रीमंत राजे बहादुर फत्तेसिंहराव महाराज भोंसले

श्रीमंत राजे बहादुर फत्तेसिंहराव महाराजांचा जन्म २६/ १ १/ १८९१ ला झाला. ते रघुजी महाराज (चतुर्थ) ह्यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचे शिक्षण राजकुमार कॉलेज येथे झाले. त्यांचे भाषांवर प्रभुत्व होते. मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दु ते उत्तम खेळाडु पण होते. ते हॉर्स पोलो छान खेळायचे त्यांची स्वतःची वेगळी टीम होती. ते इंग्रजां विरुध्द खेळायचे ते टेनिस पण उत्कृष्ट खेळायचे. ते अतिशय धार्मिक पण होते. ते सढळ हातांनी सर्वांना मदत करायचे. त्यांना घोड्यांची उत्तम पारख होती. घोड्याच्या चालीवरुन ते घोडा ओळखायचे. म्हणुन त्यांना “अश्विनी कुमार” असे म्हणत. रा.स्व. संघाच्या शस्त्र पुजनाचा त्यांना मान होता. परमहंस पुंडलिकबाबा, चिखलीचे मोहनीबाबा, कुत्तेवाले बाबा, मंडल्याचे धनीरामबाबा यांच्या सहवासात ते असायचे. काटोल चे संत गुलाबबाबा त्यांना ““गोपिचंद राजा” म्हणायचे. त्यांना संगीताची उत्तम जान होती. दर शनिवार ते स्वतः भजन करायचे श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या सोबत राजवाड्यातील राम मंदिरात भजन करायचे. समाजकार्यात पण त्यांचा सहभाग असायचा. म. गांधीच्या“चले जाओ” च्या आंदोलनाच्या आधी श्रीमंत महाराजांनी इंग्रजा विरुध्द भारत छोडो चा नारा दिला. ते सी.पी. अण्ड बेरारचे पहिले M.L.C. होते गव्हर्नर, मुख्यमंत्री नागपूरला आल्यावर महाराजांना भेटण्यास राजवाड्यात यायचे. नागपूरच्या राजकिय कार्यक्रमात त्यांना पहिल्या खुर्चिचा मान होता. त्यांनी आपला राजेशाही पोषाख कधी सोडला नाही. चुडीदार कुर्ता, शेरवाना व नागपूरी पगडी, प्रसंगा अनुरुप शेरवानी व पगडी घालायचे. इतर वेळेस भोसल्यांची भगवी टोपी घालायचे. गोर- गरीबांचे ते कैवारी होते. लोकांच्या मनात त्यांचा फार आदर होता. एकंदरीत लोकांच्या मनावर राज्य करणारे. मुर्तीलहान पण किर्तीमहान असे त्यांचे व्यक्तित्व होते. ते खरे लोकराजा होते. त्यांचे निधन वयाच्या ९० व्यावर्षी ३०/९/१९८ १ ला झाले. तेव्हा नागपूर २ दिवस बंद होते.


श्रीमंत राजे जानोजीराव महाराज भोंसले (प्रथम)

श्रीमंत राजे जानोजीराव महाराज (प्रथम) यांचा जन्म १७३३ मध्ये झाला. ते प्रथम रघुजी महाराज यांचे पुत्र होते. ते पण आपल्या पित्या प्रमाणे शुर व पराक्रमी होते. सतत दोन वर्ष ओरिसावर स्वाऱ्या करुन तिथे आपले आधिपत्य स्थापित केले. पानीपतच्या लढाईच्या वेळेस पेशवे व बाकी राजे उत्तरेकडे गेले असतांना श्रीमंत जानोजी महाराजांनी निजाम अलीवर वचक ठेवण्यासाठी त्याला पैठणला रोखले. जानोजी महाराजांच्या काळात रामटेक जिल्हा हा विड्याच्या पानांसाठी प्रसिध्द होता. १७६ ० मध्ये त्यांच्या काळात (नागपूर, चंद्रपूर, हिंगणघाट, सोहागपूर, बोरी, पवनी ह्या ठिकाणी टांकशाळा काढण्यात आल्या होत्या. त्यांनी सक्करदरा येथे भरमार तोफांचा कारखाना निर्माण केला. त्यांच्या राज्याच्या वेळेस शुध्द सोनं १७ रु. तोळा (१ २ ग्रॅम) हा भाव कायम होता त्यांचा सर्व काळ राज्याचा विस्तार करण्यात गेला सततच्या लढाया व परिश्रमाने वयाच्या ३९ व्या वर्षी २१मे १७७२ ला श्रीमंत राजे जानोजीराव महाराज भोंसले (प्रथम)यांचे निधन झाले