भोंसले कालीन नागपूर (सक्करदरा) :
राज्याच्या वेळेस इथे खडी साखरेचा कारखाना होता. म्हणुन या परिसराला सक्करदरा असे नाव पडले. श्रीमंत राजे रघुजी महाराज (हरितीय) यांनी १७९० मध्ये काळ्या दगडाचा सुंदर २ मजली राजवाडा बांधला व १ लाल महाल बांधला व ते तिथे राहण्यास गेले. या वाड्यात २ मोठे प्रवेशद्वार होते. त्या प्रवेश द्वारावर चढण्याकरिता दोन्ही बाजुंनी १८-१८ पायर्या होत्या वर चढुन पाहिल्यावर श्री रामटेक मंदिर दिसत असे. त्रिपुरी पौर्णिमेला श्री रामटेक मंदिरात त्रिपुर लागलेला पाहील्यावर श्री. लक्ष्मीनारायण मंदिरात त्रिपुर लावण्यात येत असे. इथे श्री गरुडेश्वराचे (शंकराचे ) तसेच श्री लक्ष्मीनारायणाचे पण मंदिर आहे. त्याला मोठा सभामंडप आहे. इथे तोफांचा कारखाना पण होता. दुसरे रघुजी महाराज हे प्राणिमित्र होते. त्यांनी सक्करदरात मोठे प्राणिसंग्राहलय बांधले होते. त्यामध्ये वाघ, चित्ते, हरणे, आस्वली व जंगली कुत्रे पण ठेवले होते. १२ कोण असलेली विहीरपण होती. नंतर इथे श्रीमंत चतुर्थ राजे रघुजी महाराज राहण्यास आले. त्यांनी हजरत ओलीया श्री संत ताजुद्दीन बाबा यांना आपल्या जवळ लाल महालात ठेवले व तिथेच त्यांनी समाधी घेतली. आता इथे बाबांचा दरगाह आहे. श्री संत हीरासिंग महाराज यांची पण लक्ष्मीनारायण मंदिरा लगत जिवंत समाधी आहे. कालांतराणे ह्य़ा दोन्ही वाड्यांचे रुपांतर बंगल्यामध्ये झाले. श्रीमंत रघुजी महाराज यांच्या निधनानंतर अर्ध्या भागाला राजे रघुजी नगर असे नाव दिले, व त्यांच्या सिंहासनारुड पुतळा बसविण्यात आला.
भोंसले कालीन नागपूर (इतवारी) :
महालला लागुनच इतवारी आहे. इथे पहीले मोठा बाजार रविवारी भरत असे. या भागात सोन्या-चांदीचा दागिण्यांची व भांड्यांची फार मोठी ओळ आहे. तसेच अत्तरओळीत सर्वप्रकारचे उत्तम अत्तर, उदबत्या, कापुर, उद वगैरे मिळतात. इथे स्वस्त धान्य बाजार, किराणा बाजार, दही बाजार, फुलांचे मार्केट, कपडा बाजार व भांड्यांची पण ओळ आहे. नागपूरात ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हा भाग अजुनपण जुन्या अवस्थेत आहे.
भोंसले कालीन नागपूर (मच्छीसाथ) :
इतवारीला लागुनच हा एरिया आहे. तिथे सर्व प्रकारचे मासे, झिंगे व इतर नदी व तलावाचे इतर प्रकार पण मिळतात. हे मार्केट फार मोठे आहे. इथे मासोळ्या मिळत असल्यामुळे याला मस्कासाथ म्हणतात.
भोंसले कालीन नागपूर (नलसाहेब चौक) :
हैदराबाद वरून आणलेली सवारी श्री नालसाहेब इथे बसते ह्य़ा सवारीच्या देखरेखी करिता मुजावराची नेमणुका केल्या होत्या व त्यांना वाडा बांधुन देण्यात आले होते. पाणाफुलांची पण इथेच व्यवस्था करण्यात आली. अनेक मुस्लिम लोकांना आणुन बसविण्यात आले. पुर्वी मोठ्या प्रमाणात नाल साहेबांचा उत्सव भरत असें. अजुन पण ह्या भागाला नालसाहेब चौकच म्हणतात.
भोंसले कालीन नागपूर (शुक्रवारी) :
इथे शुक्रवारीबाजार भरत असे. ५ एकर परिसरात नागपूरकर भोसल्यांचा राजघाट आहे.
भोंसले कालीन नागपूर (चितारओळी) :
सर्व भारतातुन कारीगर, मुर्तीकार, चित्रकार, काष्टकार, शिल्पकार, रंगारी (पेंटर) यांना आणले व चितारओळी या भागात त्यांना राहण्यासाठी घरे बांधुन दिली इथे सर्व प्रकारच्या सुंदर व उत्तम मुर्त्या बनविल्या जातात. त्यात प्रमुख्याने श्री गणपतीच्या हजारो मुर्त्या दरवर्षी बनविल्या जातात. राजवाड्यातील श्री गणपती ९ ते १० पिढ्यांपासून चितारओळीतच बनतात. इथे वर्षोनिवर्षी मुर्त्या घडविण्याचे काम चालु आहे. गणपती व मोहर्रम मध्ये माणसांना वाघ म्हणुन इथुनच रंगविण्याला सुरुवात झाली.
भोंसले कालीन नागपूर (लाकडीपूल) :
राजधानीच्या वेळेस राजवाड्याचा आजुबाजुला पाण्याचे मोठे मोठे खंदक होते. व त्यात मगर सोडण्यात येत असत. राजवाड्यात येण्याजाण्यासाठी प्रचंड लाकडीपुल होते. ते सकाळी हे पुल खडका वरुन सोडण्यात येत असत व संध्याकाळी हे सर्व पुल उचलण्यात येत असत म्हणुन ह्या भागाचे नाव लाकडीपूल असे पडले. आता इथे श्री संत गजानन महाराजांचे भव्य व सुंदर मंदिर आहे.
भोंसले कालीन नागपूर (धंतोली) :
लड्यामध्ये जो खजाना लुटून आणल्या जात होता. तो या ठिकाणी तराजुंनी तोलला जात असे. चांदी, सोने, हीरे, जवाहिरे यांची छाटनी करुन उत्तम दाग-दागिने रामटेक येथे व भारतातील मंदिरांना भेट म्हणुन देण्यात येत असे. दोन नंबरचा खजिन्यात जमा होत असे व बाकीचा सर्व लढाईमध्ये शामिल झालेल्यां ना वाटण्यात येत असे. धन तोलण्या साठी व जमा करण्यासाठी इथे मोठी कोठारे होती. धन तोलत असल्यामुळे याला. धंतोली असे नाव पडले. ते आजही कायम आहे.
भोंसले कालीन नागपूर (धरमपेठ) :
ह्या ठिकाणी न्याय दानाचे काम होत असे. त्या करिता इथे न्यायालय बांधण्यात आले होते. अपराध्याला त्यांच्या अपराधा प्रमाणे शिक्षा देण्यात येत असे. त्या करिता लहान मोठ्या न्याधीशांची नेमणुका करण्यात आल्या होत्या. इथे न्याय दानाचे काम होत असल्यामुळे: धरमपेठ असे नाव पडले. सर्वासमोर जगण्य आपराध्याला इथेच फासावर लटकविण्यात येत असे.
भोंसले कालीन नागपूर (महाल) :
सन १७३५ मध्ये श्रीमंत राजे रघुजी महाराज (प्रथम) यांनी नागपूरला आपली राजधानी स्थापन केली व राहण्यासाठी भव्य राजवाडा बांधला. ह्य़ा राजवाड्यातच सर्व मंदिरे होती. उदा. पाताळेइवर, नागेडवर, हर हनुमान खिडकी, गणपती व श्री. विठ्ठल रुक्मीनी मंदिर राजवाड्या परिसरातच दुसरे रघुजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत राणी बांकाबाई साहेबांचा पण वाडा होता हा राजवाडा आताचे कोतवाली पुलिस स्टेशन ते डि.डि. नगर विद्यालयाच्या पर्यंत होता अजूनही त्याचे कोरीव काम कायम आहे. डी.डी. नगर विद्यालयात त्यांचे देवघर होते. व राण्यांचे दाग दागीने ठेवण्यासाठी टाके (छोटे तळघर) व खोल्या होत्या. भव्य तलाव पण होता त्यातून राजवाड्याला पाण्याचा पुरवठा केला जात होता. सन १८१८ मध्ये ब्रिटीशांनी राजवाड्याला आग लावली ही आग सहा महिने धुमसत होती. त्यावरुन राजवाड्याच्या भव्यतेची कल्पना करता येवू शकते. त्यामुळे राजवाड्याचा बराच भाग जळाला. राजवाड्याचे काही द्वार (गेट) अजुनही दिमाखात उभे आहेत. उदा. कल्याणद्वार, शुक्रवार दरवाजा (गांधी गेट), भुत्या दरवाजा, पत्थरफोड दरवाजा इ. कालांतराने शुक्रवार तलाव, राजवाडा व येथील परिसराला महाल असे नाव पडले. आताच्या महाल भागात मोठा राजवाडा, लहान राजवाडा, किल्ला पॅलेस व बरेचसे जुनेवाडे आहेत. बर्याच्या शाळापण आहेत. डी.डी.नगर, लोकांची शाळा, हिंदू मुलींची शाळा, बिंझाणी कॉलेज इ. आता महाल मध्ये मोठी बाजार पेठ निर्माण झाली आहे.
भोंसले कालीन नागपूर (तुळशीबाग) :
राज्याच्या वेळेस भोंसल्यानी बऱ्याचऱ्या बागा (बगीचे) निर्माण केल्या होत्या कारण हे राजघराणे फार धार्मिक होते. ल्या मध्ये तुळशीबाग एक होय. ह्या मध्ये तुळशीच्या विविध प्रकारच्या झाडांसाठी प्रसिध्द होती. उदा.: साधी तुळस, काळी तुळस, पंढरपुरी तुळस इथे श्री. वेणूगोपालाचे सुंदर मंदिर पण बांधले ते मंदिर अजून पण कायम आहे. साध्या व पंढरपूरी तुळशीच्या उपयोग राजवाड्यातील श्री राम मंदिर व नागपूरातील इतर सर्व मंदिरात होत असे. काळी तुळशीचा उपयोग औषधांसाठी होत असे. २००-३०० वर्षा पुर्वी पासून पर्यावरणाची काळजी घेतली जात होती. तुळशीच्या बागेमुळे वातावरण शुध्द व सात्वीक राहत होते.
भोंसले कालीन नागपूर (बेलबाग) :
नावा प्रमाणेच इथे बेलाच्या झाडांची बाग होती. त्या बागेत श्री शंकराचे व श्री हनुमंताचे मंदिरे अजुनही कायम आहे. बेलांच्या पानाचा उपयोग पुजेसाठी होत असे. व बेळ फळाचा वापर बेलागीद् (मोरआंबा) व इतर औषधांसाठी केला जात असे. बेल फळांचा उपयोग बांध कामात पण होत असे. वाळलेल्या झाडांचा वापर होम हवनासाठी होत असे. ह्या बागांच्या रवरखावासाठी अनेक माळ्यांची नेमनुक केली जात असे. त्या मुळे अनेक कुटूंबांना रोजगार मिळत होता.
भोंसले कालीन नागपूर (केळीबाग) :
पुजा पाठ, होम-हवन होत असल्यामुळे पुजेकिरता, उपासासाठी फार प्रमाणात केळीचा वापर होत असे. त्यावेळेस सर्व साधारण पणे केळीच्या पानांचा उपयोग भोजनासाठी होत असे. रोज होकडो लोग राजवाड्यात भोजन करीत असत. ब्राह्मण भोजन पण होत असे. केळीच्या खांबांचा उपयोग पुजे मध्ये होत असे. श्री शंकराचे व श्री नारायणाचे सुरेख मंदिर आहे. तसेच श्रीमंत रघुजी महाराजांचा गुरुंचा पादुका पण आहेत. अजुनही श्रीराम नवमीला रामांचे वहन (मिरवणूक) केळीबागेत येण्याची परंपरा चाळू आहे. बाग संपली पण नाव कायम आहे.
भोंसले कालीन नागपूर (उंटखाना) :
नागणपूरकरांचा सेन्यात मोठ्या प्रमाणात अरब सेनिक होते. ते अफगाणीस्तानातून उंटावर बसुन येत असत. सोबत त्यांचा फोजफाटा असायचा त्याकरिता उंटखान्यात मोठा परकोट बांधण्यात आला. राजांच्या उंटांचा मोठा ताफा होता. उंटावरुन तोफाचा मारा करत असत. उंटांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था इथेच करण्यात आली होती. त्याची देखभाल करणारे औषध उपचार करणारे सर्व मंडळी तिथेच राहत असत. आता इथे मुक-बधिर विद्यार्थ्यांसाठी शाळा आहे. कालांतराने ही जागा श्रीमंत रघुजी महाराज (चतुर्थ) यांनी शाळेला दान दिली.
भोंसले कालीन नागपूर (हन्तीखाना) :
श्रीमंत रघुजी महाराजां जवळ ५०० उत्तम प्रकारचे हत्ती होते. त्यांना ठेवण्यासाठी हत्तीखाना निर्माण करण्यात आला. इतर कामांसाठी व लढाईसाठी वापरण्यात येणारे हत्तीपण इथे ठेवण्यात येत होते. हत्तींना लागणारी खाद्य सामग्री उदा. ऊस, गुळ, तुप यांच्यासाठी मोठी कोठारे बांधण्यात आली होती. अनेक माहुतांची नेमणुक करण्यात आली होती. त्यांना राहण्यासाठी तिथे खोल्यापण होत्या पाण्यासाठी मोठी होदे (टाक्या) बांधण्यात आले होते.
भोंसले कालीन नागपूर (चिमणपागा) :
रघुजी महाराजांच्या घोडदलात दहा हजार घोडे होते. त्यामध्ये तुर्की, अरबी व भिमथडी घोड्याचा प्रामुख्याने समावेश होता. त्या सर्व घोड्यांना चिमण पागेत ठेवण्यात येंत होते. त्यांचा एक प्रिय घोडा होता त्यांचे नाव चिमण होते. म्हणुन त्या जागेचे नाव चिमण पागा असे पडले. घोड्यांची देखभाल करण्या करिता सईसांची (नोकरांची) नेमणूक करण्यात आली होती. त्यांना राहण्यासाठी इथे व्यवस्था होती. घोड्यांना खरारा करणे, चारा पाणी व औषधांची पण इथे सोय करण्यात आली होती. अजुन पण ही जागा चिमण पागा नावाने ओळखली जाते. व्यापाऱ्यांची घोड्यांची पण इथे निगा राखली जात होती.
भोंसले कालीन नागपूर (गाडीखाना) :
इथे सर्व प्रकारचे टांगे, बगग्या, होदे, अंबार्या, बंड्या, छकडे, चाबुक बनविले जात होते व ठेवण्यात येत होते. मोर तोड झालेली वस्तु सुधारण्यात येत असे. लाकडी बेल पण मोठ्या प्रमाणात बनविण्यात येत असत. व्यापारासाठी बाहेरुन येणारे घोडा, गाड्या, बैल बंड्या पण इथेच ठेवण्यात येत असत व त्याची देखरेख केली जात होती. आताचे जयकमल कॉम्प्लेक्स म्हणजे जुना गाडीखाना.
भोंसले कालीन नागपूर (हुजूरपागा) :
हुजूर पागा म्हणजे नोकरांसाठी (कामगार) राहण्याचे ठिकाण इथेच राजवाड्यात काम करण्यारे सर्व लोक राहत असत. त्यामध्ये स्त्री, पुरुष, कामगार, कोठीवाण, भालदार, चौपदार, रखवालदार, आपल्या कुटूंबा सोबत राहत असत. इथे ह्य़ा सर्वांच्या राहण्याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था होती. आजारी पडल्यास वैद्यराजची पण सोय होती. हुजूर पागामध्ये आता होंडा मॅस्कॉटचे शोरुम आहे.
भोंसले कालीन नागपूर (झेंडाचौक) :
ह्या चौकात नागपूरकर भोसल्यांचा भगवा झेंडा फडकत असे. त्यांच्या देखभाली करिता श्री. जाधव यांना आले होते. त्यांच्या हाताखाली बरेच कामगार होते. त्याकरिता त्यांना इथेच दोन मजली वाडा बांधुन देण्यात आला होता. ते (इंचार्ज) असल्यामुळे त्यांना नायक म्हणत असत कालांतराने नायक चे नाईक झाले. त्यांच्यावर सर्व झेंड्याचा देखभालीची जबाबदारी होती. आता त्या वाड्यात शाळा आहे. पण जागेला नाव अजुन कायम आहे.
भोंसले कालीन नागपूर (रेशीमबाग) :
भातल्यांचे राज्य फार मोठे होते. त्यांचा व्याप पण फार मोठा होता. त्यांनी बाहेरुन रेशमाचे किडे व त्यांचे संगोपण करणारे झाडे, वेली, आणुन राजवाड्या लगत रेशिमबाग हा तयार केला. ह्य़ा बागेत उत्तम पैकी रेशमी दोर्यांची उत्पत्ती होत असे. व त्यांच्या पासुन उंची व सुंदर वस्त्र बनविण्यात येत असत. हे धागे व वस्त्र बनविण्यासाठी भारत भरातून बुनकर व काशीदाकारी करणारे नागपूरात आले, व स्थायीक झाले व नागपूराच्या रेशमी कपड्यांना खुप मागणी होती. त्यामुळे नागपूरला मोठी बाजारपेठ निर्माण झाली होती. त्याकाळात बहुसंख्या लोक रेशमि वस्त्राच्या व्यापारात जात होते. त्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळत असे. कालांतराने रेशिम उद्योग बंद झाला व जागा रिकामी झाली. आता इथे खेळण्यासाठी मोठे मैदान आहे व काही भाग राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे वास्तव्यात आहे. ही जागा अजुनही रेशिमबाग म्हणुनच प्रसिध्द आहे.
भोंसले कालीन नागपूर (संत्रा मार्केट बाजार ) :
श्रीमंत दुसऱ्या रघुजी महाराजांनी नागपूरला संत्र्याची उत्पत्ती (इजात) केली. व येथील वातावरण अनुकुल आसल्यामुळे संत्र्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होऊ लागले. संत्रे विकण्यासाठी बर्डी येथे जागा देण्यात आली. व्यापारी व बागायीतदार इथे सर्व प्रकारचे संत्रे आणुन विकत असे. कालांतराने ब्रिटीशांनी अर्ध्या जागेत रेल्वे स्टेशन बांधले. २०-२५ वर्षांपासुन रेल्वेचा विस्तार झाला व प्लॅटफार्म वाढले व इथले मुळ संत्रामार्केट कळमण्याला नेण्यात आले. पण आजही लहान प्रमाणात इथे संत्र्याचे मार्केट भरते. व आजही या जागेला संत्रा मार्केट म्हणुन ओळखले जाते.
भोंसले कालीन नागपूर (गोंधळीपुरा) :
भोंसले महाराजांच्या वेळेस खुप पुजापाठ होत असत कारण ते फार धार्मिक होते. त्यांची प्रजापण नियमीत पुजा-अर्चना करित असत. त्यामुळे नवरात्रात देवी, खंडोबा, लग्नाच्या व लडाईत जिंकून आल्यावर गोंधळ करण्यात येत असे. या करिता महाराष्ट्रातुन उत्तम गोंधळी आणुन येथे वास्तव्याला ठेवण्यात आले. व त्यांच्या कडुन उत्तम प्रकारचे गोंधळ करुण घ्यायचे. कालांतराने त्यांचा विस्तार झाला व अजुनही गोंधळी समाज येथे राहतो व आपली उपजिवीका चालवितात.
भोंसले कालीन नागपूर (जागनाथ बुधवारी) :
या ठिकाणी बुधवारी आठवडी बाजार भरत असे. गावातील लोक येथे भाजीपाला विकत असत. इथे एक सुंदर जागृत शंकराचे मंदिर आहे. मंदिर अतिशय सुंदर व भव्य आहे. हे मंदिर जागृतेश्वर महादेव म्हणुन प्रसिध्द आहे. अजुनही राजघराण्यातील इथे. पहिले (प्रथम) लग्नपत्रिका ठेवण्यात येते. ५ मंदिरापैकी (जिथे भोंसले राजे प्रथम पत्रिका ठेवतात) हे एक मंदिर आहे. हे बुधवारी येथे असल्यामुळे या जागेला जागनाथ बुधवारी असे म्हणतात.
भोंसले कालीन नागपूर (महाराजबाग) :
शिकारी मधे जखमी झालेले वाघांचे, सिंहांचे छावे, हरिण, बारोसिंगा (सांबार), अस्वल, चित्तळ, व इतर बऱ्याच जनावरांचे पिल्ले ह्या ठिकाणी पिंजऱ्यात ठेवण्यात येत होते. इथे सुंदर बगिचापण आहे. जनावरांसाठी खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उन्हाळ्यात सर्व राजपरिवारातील राण्या, राजबालके हवाखोरी साठी इथे जात असत. आजपण महाराज बागई लोकांच्या आवडीचे ठिकाण आहे. कालांतराणे ही बाग सरकार (गव्हर्णमेंट) ला देण्यात आली.
भोंसले कालीन नागपूर (धान्यगंज) :
नागपूर महाराजांच्या काळात येथे अन्न धान्याचा साठा करण्यात येत असे. सर्वप्रकारचे धान्य साठविण्यासाठी मोठी-मोठी कोठारे बांधण्यात आली होती. राजवाड्यात येथूनच धान्य पुरविण्यात येत असे. जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा ह्याच साठ्यातुन जनतेला धान्य देत असे. व रयतेला उपासमारी पासुन वाचविण्यात यायचे. आताही इथे धान्य बाजार भरतो.
भोंसले कालीन नागपूर (मोतीबाग) :
इथे सर्वप्रकारच्या मोत्यांचा व्यापार होत असे. शिंपल्यातून खरे व मौल्यवाण मोती काडून विकण्यात यायचे. नागपूर राज्य मोत्यांसाठी फार प्रसिध्द होते. म्हणूनच नागपूरकर भोंसल्यांना मोतीवाला राजा म्हणून ओळखल्या जायचे. सर्व भागातून व्यापारी इथे येत असत. कारण ही मोतींची सर्वात मोठी व्यापारपेठ होती. कालांतराने येथे रेल्वेचे डब्बे व इंजन ठेवण्यासाठी यार्ड बनविण्यात आले. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी क्वॉटर पण बांधण्यात आले. अजूनपण मोतीबाग ह्या नावाने परिसराला ओळखल्या जातो.
भोंसले कालीन नागपूर (जरिपटका) :
भोंसले महाराजांच्या राज्यात लडाई मध्ये वापरण्यात येणारे कपड्यांचे साहीत्य इथे ठेवण्यात येत होते. त्यामध्ये ४० ते ५० फुटाचा भगवा झेंडा, पताका, जरीच्या कापडाने सजविलेले खांब, चिलखती व इतर सामान ठेवण्यात येत असे अजुनही हा भाग (परिसर) जरिपटका म्हणुन ओळखला जातो.
भोंसले कालीन नागपूर (तेलीपुरा) :
या ठिकाणी शेंगदाणे, तीळ, जवस, एरंडी इत्यादी पासुन तेल काढण्यासाठी मोठ-मोठ्या तेलघाण्या होत्या. त्या वेळेस बैलांच्या साहाय्याने तेल काढले जात होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज २४ तास असे म्हणून सर्वजन येथे वस्ती करुन असायचे, कालांतराने तेलघाण्या बंद झाल्या आता येथे मोठी लोकवस्ती झाली आहे. नाव अजुनही तेच कायम आहे.
भोंसले कालीन नागपूर (तेलंगखेडी) :
येथे तेल साठविण्यासाठी मोठे मोठे हौद बांधण्यात आले होते तेलीपुऱ्यातुन पखालींनी तेल आणुन साठवून ठेवण्यात येत होते. येथे पुरातन शंकराचे मंदिर आहे. (कल्याणेश्वर मंदिर ज्यांची बांधणी हेमाडपंथी आहे.) दुसरे मंदिर श्री हनुमंताचे आहे. हा मारोती नवसाला पावतो. अजुनही येथे दर शनिवारी मंगळवारी, हनुमान जयंती व श्रावण महीण्यात गर्दी असते. अजुनही ही जागा. तेलंगखेडी मारोती म्हणुन प्रसिध्द आहे.
भोंसले कालीन नागपूर (अंबाझरी) :
येथे राजधानीच्या काळात तोफांसाठी लागणारा दारु-गोळा बनविण्यात यायचा. इथे बारुदचा कारखाणा होता. कारण त्यावेळेस लोकसंख्या व लोकवस्ती कमी होती. इथे पुर्णपणे काळजी घेतली जात होती. जेणे करुन प्रजेची हाणी होणार नाही. आता इथे सुंदर बगिचा आहे.
भोंसले कालीन नागपूर (हजारी पहाड) :
या ठिकाणी हजार छोट्या-छोट्या टेकड्या होत्या. येथे आपट्याचे झाड (दसऱ्यात सोने म्हणुन वापरतात त्या पानाचे झाड) , क्षमीचे झाड व ईतर अनेक वनऔषधीची झाडे होती. आता हा परिसर सेमिनरी हिल्स म्हणुन ओळखल्या जातो. व प्रसिध्द आहे. येथे छान बाग बनली आहे. बागेत चक्कर मारण्यासाठी फुलराणी म्हणुन ट्रेनपन आहे. इथे प्राणी संग्रहालय देखिल आहे. काही भाग अजुनही हजारी पहाड म्हणुन ओळखला जातो.
भोंसले कालीन नागपूर (भालदारपुरा) :
राज्याच्या वेळेस ह्या ठिकाणी शस्त्र-अस्त्र बनविण्यात येत असत. भाले, तलवारी, कट्यारी, बिछवे, ढाली, चिलखती, सिरस्त्राणे (हेल्मेट), खंजीर इत्यादी. आता येथे लोकवस्ती आहे. तरीपण नाव तेच कायम आहे.
भोंसले कालीन नागपूर (दहिबाजार) :
येथे मोठ्या प्रमाणात आजुबाजुच्या गाव-खेड्याचे लोक आपल्याकडील दही, दुंध, लोणी, तुप, खवा विकण्यास येत असत, अजुनही येथे दही बाजार मोठ्या प्रमाणात भरतो.